महाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का ? हा प्रश्न मनी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.
www.msceia.in वेबसाइटद्वारे संस्था चालकांना संघटनेचे कार्य, योजना, आजीव सभासदची परिपूर्ण माहिती ,शासन आदेश याचबरोबर इतरही महत्वपूर्ण घडामोडी क्षणात प्राप्त करून घेण्याची संधि निर्माण करून दिली आहे.संघटनेची वेबसाइट उघडून त्याचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास आपण कोठे होतो आणि आज कोठे आहोत हे आम्हा कार्यकारिणीस सांगायची आवश्यकता राहिली नाही ही आमची कामाची पावती आहे. राज्य संघटनेचे कार्य, संस्थाचा राज्यातील वाढती संख्या, पोस्टाचा होणारा विलंब अथवा खर्च या सर्व बाबीचा संघटनेच्या हिताचा विचार करूनच www.msceia.in या वेबसाइटचा परिपूर्ण वापर करून गतिमान प्रशासन करण्याचा आमच्या प्रयत्नाचे आज अनेक संस्था चालकांनी कौतुकच केले आहे.
संस्थाचालकाणी वेबसाईटचा वापर दैनंदिन करावा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची वेबसाइट www.ms-ce.org पाहताना संघटनेची www.msceia.in ही पण वेबसाइट अवश्य पाहून दैनंदिन कामकाज करताना आवश्यक वाटणार्या बाबींची नोंद घ्यावी. संघटनेचे वेबसाइटवर शासन आदेश, परिपत्रक, तातडीचा पत्रव्यवहार , परीक्षा पद्धती संघटना कार्य, संस्थाच्या हिताच्या गोष्टी त्याचबरोबर राज्यातील शासनमान्य वाणिज्य संस्था राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे अधिपत्याखाली टंकलेखन / लघुलेखनाचे प्रशिक्षण देवून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पत्रातधारक विद्यार्थी घडवित असताना व याकामी राज्याचे शिक्षण मंत्री ,शिक्षण खाते (माध्यमिक विभाग) अध्यक्ष व परीक्षा परिषद यांच्यात समन्वय दर्शिवणारी वेबसाइट उपलब्ध करताना मा. आयुक्त तथा अध्यक्ष महावीर माने साहेब, संघटनेचे पदाधिकारी, या क्षेत्रातील आमचे मित्र परिवार यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाल्यानेच हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेताना अतिशय आनंद होत आहे .

मा.ना राजेंद्रजी दर्डा
माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. डॉ. नंदकुमार बेडसे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

श्री.प्रकाश कराळे
अध्यक्ष, राज्य संघटना, माजी अशासकीय सदस्य,म रा प प,पुणे

मा. घनश्याम कुंभळकर
वरीष्ठ उपाध्यक्ष

संतोष दाणी
महासचिव

पंकज ठाकूर
कोषाध्यक्ष

निळकंठ कुंभार
प्रवक्ते

जोसेफ रुबेन
प्रसिध्दी प्रमुख